सध्या सर्व लोक how to take care at home घरचा घरीच केसांची काळजी घ्यायचा प्रयत्न करत असतात . कोणते ही केमिकल न वापरता घरचा घरीच how to take care at home या बदल टिप्स बघूया
How to take care at home | घरच्या घरीच केसांची काळजी
रोज सकाळी अनशापोटी चिमूटभर ज्येष्ठीमध पावडर घ्यावी. याने केसांची वाढ चांगली होते.
नौर्मल केसांसाठी पूर्ण अंडं वापरा. हे केसांना कंडीशनिंग करतं. अंड्याचा पांढरा बलक तेलकट केसांकरता उपयुक्त असतो, तर पिवळा बलक कोरड्या केसांकरता. यातील जो बलक तुम्हाला उपयोगी पडेल तो १/२ कप घ्या व स्वच्छ ओल्या केसांना लावा. संपूर्ण स्काल्पला नीट लावा. २० मिनिटांनी गार पाण्याने धुवा व नंतर शाम्पूने धुवा. पिवळा बलक महिन्यातून एकदा, तर पांढरा बलक दर दोन आठवड्यांनी वापरा.
निर्जीव केसांसाठी १/२ कप दही लावून २० मिनिटं ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर शाम्पू लावून नेहमीप्रमाणे केसांवरून अंघोळ करा. यामुळे केस स्वच्छ होतात व दह्यातील फैट्समुळे केसांना मौश्चरायझर मिळते.

0 टिप्पण्या