डोकेदुखी हे घरगुती उपाय तुम्हाला काही मिनिटांत देऊ शकतात आराम…डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. बद्धकोष्ठ, पोटात गॅस होणे, उच्च रक्तचाप असणे, नजर कमजोर होणे, जागरण, अति परिश्रम, अशक्तता इत्यादि. साधारण डोकेदुखी असल्यास हे घरगुती उपाय तुम्हाला काही मिनिटांत देऊ शकतात आराम उपाय पुढीलप्रमाणे:


how to stop headache immediately at home

1) एका बत्ताश्यावर 4 थेंब अमृतधारा टाकून खावे. 2 थेंब रूमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत रहावे.


2) लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.


3) चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते


4) तिळाचे तेल 250 मि.ली., चंदनाचे तेल 10 मि.ली. दालचीनीचे तेल 10 मि.ली. आणि कापूर या सर्वाना मिसळून बाटलीत भरून ठेवावे. हे तेल डोक्यास लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.


5) दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे, वरून एक पेला कोमट दूध घ्यावे.


6)रोज सकाळी रिकाम्यापोटी एक सफरचंद कापून, मीठ लावून चावून खाल्याने जूनी डोकेदुखी दूर होते. हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.