मेथीवाला सँडविच Recipes-
साहित्य : एक कप भिजवून वाटलेली मुगाची डाळ, दोन चमचे हिरव्या मिरचीचं वाटण, एक बारीक चिरलेला कांदा, एक कप बारीक चिरलेली मेथीची पानं, मीठ, एक चमचा जिरंपूड, एक चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा लिंबाचा रस, थोडा हिंग, एक मोठा चमचा बेसन, चिमूटभर सोडा, लोणी आणि ब्रेड स्लाईस.
कृती :
ब्रेडचे टोस्ट करून घ्यावे. वाटलेल्या डाळीत बाकीचं साहित्य घालून ते मिसळावं. ब्रेडच्या टोस्टवर डाळीच्या मिश्रणाचा पातळ थर लावून घ्यावा.
नॉनस्टीक तव्यावर किंवा पॅनमध्ये लोणी किंवा तेल गरम करून त्यावर हा टोस्ट लालसर भाजावा. खायला देताना बरोबर टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी द्यावी.
मेथीऐवजी बारीक चिरलेला कोबी, गाजर, पालक वगैरे घालूनही आपण हे सँडविच करू शकतो.

0 टिप्पण्या