केस गळतात आज पासूनच हे उपाय करून बघा.
बदलते ऋतू ,शाम्पू बदलणे, प्रदूषण, धूळ अशा अनेक कारणांमुळे केस गळतात. केस गळती होऊ नये यासाठी काय उपाय करावेत हे जाणून घेऊयात..
सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपतांना आवळा वाटून केसांत लावून लेप करावा. एक तासाने कापडाने पुसुन घ्यावे. सकाळी स्नान करतांना धूवून घ्यावे. केस धुतांना साबण किंवा शॅम्पू वापरू नये.
शेतातली स्वच्छ माती घेउन त्याने केस धुवावे. माती उपयोग करण्या पूर्वी 15- 20 मिनिटें पाण्यात भिजवून ठेबावी. चांगली चोळून गाळून घ्यावी व त्या पाण्याने केस धुवावे.
2-3 लसणाच्या पाकळ्या डोळ्याल्या लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20 ते 30 दिवस हा लेप दररोज करावा.
दिवसातून 2-3 वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

0 टिप्पण्या