तोंडाचा घाण वास येतो या टिप्स ठरतील फायदेशीर…
दात स्वच्छ घासल्यानंतरही अनेक वेळेस तोंडाला घाण वास येतो. हे दैनंदिन जीवन आणि सामाजिक संवादात व्यत्यय आणू शकते. ह्या खास टिप्स ठरतील फायदेशीर,तोंडातील दुर्गंधी होईल गायब.
1) जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळा चमचाभर बडीशेप चघळल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पाचन क्रिया पण सुधारते.
2) तुळशीची चार पाने रोज खाऊन वरून पाणी प्यायल्याने तोंडाचा वास जातो.
3) एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळी चूळा भरल्यास तोंडाची दुर्गन्ध नाहीशी होते.
4) जेवणानंतर एक लवंग चघळल्याने तोंडाचा वास जातो.
5) डाळिंबाच्या सालीचे चूर्ण 4 ग्रॅम घेउन फक्की मारावी व पाणी प्यावे. साल उकळून त्या पाण्याने चूळा भरल्याने सुद्धा तोंडाचा घाण वास जातो.
6) जिरे भाजून खाल्याने तोंडाचा घाण वास जातो
7) धणे खाल्याने तोंडात सुवास येतो. जेवण झाल्यावर थोडे धणे अवश्य खाल्ले पाहिजेत.
8) एक चमचा आल्याचा रस एक ग्लास गरम पाण्यात टाकून त्याने चूळ भरल्यास तोंडाचा घाण वास जातो.
तोंडाचा घाण वास येतो या टिप्स ठरतील फायदेशीर.

0 टिप्पण्या