What diet is good for diabetes?मधुमेहासाठी कोणता आहार चांगला आहे?
मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींसाठी आहार व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. संतुलित आणि योग्य आहार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, तसेच मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतींना प्रतिबंध करतो. खालीलप्रमाणे, मधुमेहासाठी कोणता आहार चांगला आहे…
त्यांनी खाण्यासाठी अशा गोष्टीचा समावेश करावा ज्यांना पचनासाठी वेळ लागेल जसे की चपाती किंवा पोळी नाही तर ज्वारी बाजरी किंवा नाचणी ची भाकरी खाणे उत्तम.
सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाव्यात फळांमध्ये सफरचंद संत्रा मोसंबी अशी फळे खावीत.
डाळीमध्ये चणाडाळ उडीद डाळ मसूर डाळ राजमा आणि मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मूंग मटकी चणे किंवा काबुली चणे खाऊ शकता.
मधुमेह असल्यास मच्छी म्हणजे मांसाहारत मासे खाणे अतिउत्तम.
अंड्याचा पांढरा भाग खावा कधी कधी चिकन ही खाऊ शकता.
सुक्या मेव्यामध्ये बदाम आणि अक्रोड खाऊ शकता.
रोज दही किंवा ताक खाणे ही खूपच फायदेशीर ठरू शकते.

0 टिप्पण्या