घरगुती मौश्चरायझर
१/२ चमचा गुलाब पाण्यात १ चमचा मध घाला आणि हे चेहऱ्याला १५-२० मिनिटे लावा. चेहरा कोमट पाण्याने धुवा. हे देईल तुम्हाला मऊ त्वचेचा अनुभव.
१/४ सफरचंद सोलून ते किसा व फ्रीजमध्ये गार करायला ठेवा. हे चेहऱ्याला १५ मिनिटं लावा. नंतर गार पाण्याने धुवा. सफरचंदाने त्वचा चमकते.
१ चमचा क्रीम घ्या. ते फेटा. ते अंघोळीआधी चेहऱ्याला आणि मानेला लावा. हे त्वचेचा राप (टैन) काढण्यास मदत करते.
३/४ कप गुलाब पाणी, १/४ कप ग्लिसरीन, १ चमचा व्हिनेगर व १/४ चमचा मध हे मिश्रण एका बाटलीत ठेवा आणि रोज क्लिन्झिंगनंतर वापर.

0 टिप्पण्या