सुरणाचे उपवासाचे वेफर्स-
सुरण (Suran) ही एक पौष्टिक कंदमुळे आहे. सुरण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की पचन सुधारणे, वजन कमी करण्यास मदत करणे, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे.आज आपण अशीच एक पौष्टिक उपवासचे वेफर्सची recipe पाहाणार आहोत पुढीलप्रमाणे…..
साहित्य : अर्धा किलो सुरण, ४, ५ आमसुले किंवा चिंच, एक चमचा मिरची पूड, शिंगाड्याचे पीठ, वरीचे पीठ, तेल, मीठ.
कृती : प्रथम सुरणाचे पातळ काप करावेत. नंतर स्वच्छ धुवून आमसुलाच्या किंवा चिंचेच्या पाण्यात बुडवून चाळणीत ठेवावेत.
शिंगाड्याच्या पीठात मिरची पुड व थोडेसे मीठ व थोडेसेच पाणी टाकून मळावे नंतर सुरणाच्या कापांना ते मिश्रण लावावे. त्यानंतर हे काप वरईच्या पीठात घोळवून कडकडीत तेलात तळून काढावेत. हे काप कुरकुरीत चविष्ट लागतात.

0 टिप्पण्या