मक्याची कणसाची भाजी :-
साहित्य - कोवळ्या कणसाचे दाणे काढून, तितकाच कांदा, जिरे, ओली मिरची, तिखट, हळद, मीठ, नारळाचा चव
कृती - कणसाचे दाणे काढून, तितकाच कांदा चिरून तेलांत जि-याची फोडणी करून त्यांत टाकावे. ओली मिरची, तिखट, हळद मीठ व नारळाचा चव, शिजण्याकरितां पाणी घालावें.
पाहिजे असल्यास बटाटयाच्या फोडी घालाव्या किंवा हळद, तिखट, सांबार मसाला घालूनही करावी.

0 टिप्पण्या