चेहऱ्यावरच्या मुरूमावर रामबाण घरगुती टिप्स :-
1)एक कप दूध चांगले आटवावे. दाट झाल्यावर एक लिंबू पिळून हलवत असतांना थंड करावे. रात्री झोपतांना याला चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावे. सकाळी धुवून घ्यावे. याने मुरूमं बरी होउन चेहरा उजळून तजेलदार होतो.
2)मसूर ची डाळ बारीक वाटून दुधात घुसळुन घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. दहा मिनिटांनी चेहरा धूवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा.
3) संत्र्याची साले 100 ग्रॅम घेऊन वाळवून वाटून चूर्ण करावे. यात 100 ग्रॅम बाजरी चे पीठ व 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसातच चेहरा उजळून निघेल.
4) गाजराचा रस, टमाट्याचा रस, बीट चा रस 25-25 ग्रॅम दररोज दोन महिने पर्यंत प्याल्याने चेहऱ्यावरची मुरुमे, डाग, सुरकुत्या नाहिश्या होतात.
5) लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब अर्क, 2 तोळे ग्लिसरिन, मिसळून बाटलीत भरून ठेवावे. रात्री झोपतांना चेहऱ्यावर चोळून लावावे. वीस दिवस उपचार केल्याने मुरुमंपुटकुळ्या दूर होउन त्वचा मऊ व तजलेदार होते.

0 टिप्पण्या