तांदळाचे पाणी चेहऱ्यावर कसे लावावे how to use rice water on face -
पद्धत
1. उकळून बनवलेले तांदळाचे पाणी-
1. अर्धा कप तांदूळ धुवा.
2. त्यात 2 कप पाणी घालून उकळा.
3. तांदूळ शिजल्यावर त्याचे पाणी गाळून घ्या.
4. ते पाणी थंड होऊ द्या आणि बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
5. हे 5-7 दिवस टिकते.
पद्धत
2: भिजवून बनवलेले तांदळाचे पाणी
- अर्धा कप तांदूळ धुऊन त्यात 1 कप पाणी घाला.
- 30 मिनिटे तसेच ठेवून द्या.
- नंतर ते पाणी गाळून बाटलीत साठवा.
रोज संध्याकाळी किंवा रात्री चेहरा स्वच्छ करून, कॉटनच्या बोळक्याने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा.
15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
यासोबत मॉइश्चरायझर वापरल्यास चांगले परिणाम मिळतात.

0 टिप्पण्या