Sweet corn खायला जसे चवदार आहे तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे मक्याच्या कणीसमध्ये पोषक घटक आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या प्रोटीन असतात. या लेख मध्ये आपण मक्याचा हेल्दी आणि टेस्टी पराठा पाहणार आहोत…
Sweet corn recipe -
साहित्य : दोन वाट्या मक्याचे ओले दाणे,
दोन बटाटे, सात-आठ हिरव्या मिरच्या, कढीपत्ता,
मूठभर पुदिन्याची पानं, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, मीठ, हळद, साखर, आलं किसून दोन चमचे, चार चमचे कॉर्नफ्लोअर, दोन वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, कोथिंबीर बारीक निरून, एक चमचा आमचूर किंवा चाट मसाला, तेल, हवा असल्यास चमचाभार गरम मसाला.
मक्याचा पराठा-sweet corn recipe
मक्याचे दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून ते पाच मिनिटं कुकरमध्ये वाफवून घ्यावे. दोन बटाटे उकडावेत. एक पळी तेल कढईत गरम करून त्यात कढिपत्ता, वाटलेली मिरची, हळद घालून किसलेलं आलं घालावं. थोडं मीठ आणि किंचित साखर घालावी. चार चमचे कॉर्नफ्लोअर घालून वाफ येऊ द्यावी. नंतर हे मिश्रण गार करावं. त्यात चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं बारीक चिरून घालावी. नंतर चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करावं. त्यात अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं किंचित गुलाबीसर भाजून घालावं.
मळलेल्या पिठाचे लहान गोळे घेऊन दोन पाऱ्या लाटाव्या. त्यात या मिश्रणाचा गोळा घालून पोळपाटावर जाडसर पोळी लाटावी आणि तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी गुलाबीसर भाजावी. लोणी, गोड दही, बटर किंवा शेंगदाण्याच्या दह्यातल्या चटणीबरोबर गरमागरम खायला द्यावा.

0 टिप्पण्या