Zero oil cooking तेल न वापरता जेवण करणं शक्य आहे का?
तेल न घालता चवदार जेवण कसं करायचं Zero oil cooking असा प्रश्न पडला असेल तर या सोप्या ट्रिक्स नक्की वाचा…
१) गॅसवर कढई ठेवून चांगली गरम करा.
२) त्यात राई आणि जिरे टाकून चांगलं तडतडवा.
३) कांदा बारीक कापून तो कढईमध्ये घाला आणि पळीने सतत हलवा. कांदा कढईच्या बुडाला चिकटायला लागला तर थोडंसं पाणी घालून पुन्हा परता.
४) आलं-लसणीची पेस्ट त्यात मिसळा आणि परता. मसाला चांगला शिजेपर्यंत परता.
५) टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा थोडंसं पाणी घाला. सतत ढवळत राहा.
६) थोड्याच वेळात मिश्रणाला एक प्रकारची चकाकी येईल.
७) मिश्रणात थोडी हळद घाला आणि ढवळा.
८) शेवटी मिश्रणात आवडीचा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.
९) हा शून्य तेल पद्धतीचा मसाला तयार झाला. त्यात स्वादासाठी गरम मसाला मिसळा.
१०) आता भाजी करायची असेल तर या तयार मसाल्यात भाजी कापून मिसळा किंवा डाळ करायची असेल तर उकडून ठेवलेली डाळ या मसाल्यात मिसळा. आवश्यक वाटल्यास थोडंसं पाणी मिसळा. भाजी शिजल्यावर वरून कापलेली कोथिंबीर पसरा आणि कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करा.

0 टिप्पण्या