* एकाग्रता वाढविण्यासाठी व तणाव दूर करण्यासाठी मेडीटेशन, योगा व ध्यान यांचा अभ्यास करावा.
* ४५ वर्षे वयानंतर आपले रुटीन चेकअप करीत राहावे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्यावीत.
* दररोज कोणताही एक व्यायाम करावा. यासाठी दररोज कमीत कमी अर्धा तास द्यावा. व्यायामाच्या पद्धती बदलत राहाव्यात. जसे कधी एरोबिक्स करावे, तर कधी पायी चालावे. व्यायामासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर पायऱ्या चढणे.
* स्टॉप अगोदर उतरून पायी जाणे, जवळच्या कामासाठी वाहनांचा उपयोग न करता पायी चालत जाणे. यांसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींतूनही व्यायामाचा लाभ घेता येईल.
* कुटुंबासाठी वेळ द्यावा. मुलांसमवेत खेळावे. आठवड्यातून एक दिवस कुटुंबाबरोबर वेळ घालवावा.
निसर्ग नियमांचे पालन करावे. रात्री निश्चित वेळेवर झोपून सकाळी लवकर उठावे.
सकाळच्या वेळी प्रातः भ्रमण अवश्य करावे अ थवा संध्याकाळच्या वेळीही काही वेळ पायी फिरता येईल. नैसर्गिक क्रियांचा अवरोध करू नये. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे. तसेच रात्रीची सात ते आठ तास झोप अवश्य घ्यावी.

0 टिप्पण्या