दूधा सोबत - दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्याच् पाने, दोडकी, बेल, आंबट फळे, सातू, हानिकारक असतात दूधात गूळ टाकून सेवन करु नये. फणस किंवा तळलेले पदा पण दूधा सोबत हानिकारक आहेत.
दहया सोबत - खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, डांग (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
तूपा सोबत- थंड दूध, थंड पाणी व सम प्रमाणात मद्य हानिकारक असते.
मधा सोबत - मूळा, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते.
मूळ्या सोबत - गुळ खाणे नुकसानदायक असते.
खीरी सोबत - खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातू घेउ नये.
गरम पाण्या बरोबर - मध घेऊ नये.
थंड पाण्या बरोबर- शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये.
कलिंगडा बरोबर - पोदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
चहा सोबत - काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
माशा सोबत - दूध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठांवर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
मांसा बरोबर - मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
गरम जेवणा बरोबर- थंड जेवण व थंड पेये हानिकारक असतात.
खरबूजा बरोबर - लसूण, मूळा, मूळ्याची पाने, दूध किंवा दही नुकसानकारक असते.
तांबे, पीतळ किंवा कांशाच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, दही, ताक, लोणी, रसदार भाज्या इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलले पदार्थ खाऊ नयेत. एल्यूमीनियम आणि प्लॅस्टिक च्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवळ्याने उकळलयाने किंवा खाल्याने अनेक प्रकार चे रोग होऊ शकतात.

0 टिप्पण्या