बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रसाधनांमध्ये केमिकल्स मिसळलेली असतात. त्यामुळे त्यांचा चटकन परिणाम होतो, परंतु त्यांच्या वापर त्वेचेसाठी घातक ठरू शकतो. त्याऐवजी नैसर्गिक वस्तूंद्वारे सौंदर्य उजळल्यास त्यांचे दुष्परिणामही होत नाहीत. जर नैसर्गिक वस्तूंद्वारे त्वचा उजळू इच्छित असाल तर खालील उपाय आजमावू शकता.




एक केळ कुस्करून त्यात थोडेसे दूध मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून ठेवावी व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

एक चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा व नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा मुलायम, चमकदार व गुळगुळीत होईल.

एक चमचा अक्रोडची पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र मिसळून दाट पेस्ट बनवून घ्या. ही पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा व नंतर पाण्याने चहरा धुवा.

दोन चमचे हळदीत दोन चमचे संत्र्याचा रस मिसळून चेहऱ्यावर व मानेवर चोळा. पंधरा मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.


दोन चमचे हळदीत दोन चमचे संत्र्याचा रस मिसळून चेहऱ्यावर, मानेवर चोळा. पंधरा मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.


चेहऱ्यावर पपईचा एक तुकडा चोळा. थोड्या वेळानंतर धुवा. यामुळे मृतपेशी नाहीशा होऊन त्वाचा उजळेल.


कोबी कापून दोन कप पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेत चमक येईल.


अर्धा कप साखरेत एक चमचा लिंबाचा रस मिसळा. स्नान करताना संपूर्ण शरीरावर ही पेस्ट लावून हलक्या हाताने चोळा व नंतर स्नान करा.