How to make you nail look attractive
नखं सुंदर ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हातापायांना मौश्चरायझर लावावं.
महिन्यातून कमीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये वा घरच्या घरी तरी पेडिक्योर आणि मैनिक्योर करून घेणं आवश्यक आहे.
नेल आर्ट करण्यापूर्वी सर्वप्रथम मैनिक्योर आणि पेडिक्योर करवून घ्यावं. त्यामुळे हातापायांची नखं स्वच्छ आणि सुंदर होतात. मात्र, नेल आर्ट करण्याच्या २ ते ३ दिवस अगोदर तरी नेलपेण्टचा वापर करू नका.
अधूनमधून आपल्या नखांना नेलपेण्ट लावल्याशिवाय तसंच ठेवल्यास नखांना नैसर्गिक गुलाबीपणा येईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणात फळं, ज्यूस, सलाड, हिरव्या भाज्या आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.
घरगुती कामं झाल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुतल्यानंतर हातांना व बोटांना क्रीम लावून थोडा वेळ मसाज करावा.

0 टिप्पण्या