फळांच्या उरलेल्या सालीची ही चटणी नक्की करून पाहा..
फळांच्या सालीमध्ये अनेक पोषक घटक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सालींमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात.फळांच्या सालीची ही चटणी तुम्हाला माहिती आहे का….
साहित्य : १ वाटीभर कैरीच्या साली, १ ओल्या खोबऱ्याची वाटी, ५-६ मिरच्या, १ चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धी जुडी कोथिंबीर, पाव चमचा जिरे.
कृती : कैरीच्या साली, खोबरे, मीठ, साखर, मिरच्या, कोथिंबीर, जिरे सर्व एकत्र करुन वाटावे. प्रत्यक्ष कैरी न घालता फक्त कैरीच्या साली वापरूनही ही चटणी करता येते. ह्या चटणीत आवडीनुसार चणाडाळ घालायची असल्यास एक वाटी भिजवलेली डाळ वाटण्यास घ्यावी आणि वरून दोन चमचे तेलात हिंग-मोहरीची फोडणी घालावी.
फळांच्या उरलेल्या सालीची ही चटणी नक्की करून पाहा .

0 टिप्पण्या