वजन कमी होत नाहीये मग या टिप्स नक्की फोलो करा..
वजन कमी करण्यासाठी, आहारात बदल करणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेसा आराम करणे या सोबतच या काही टिप्स देखील फायदेशीर ठरतील ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
१) चॉकलेट, बिस्किटं, ड्रायफ्रुट असे पदार्थ शक्यतो नजरेपासून दूर ठेवावेत. जातायेता नजरेला पडतील असे ठेवू नयेत.
२) दही, ताक यांसारखे थंड पदार्थ दुपारच्या जेवणात घ्यावेत. रात्री शक्यतो असे पदार्थ खाऊ नयेत.
३) स्वयंपाक सगळा शिजवून झाल्यावर जेवायला बसताना कोशिंबीर किंवा सॅलड करावे.
४) लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा यांचा रस काढल्यावर तो लगेच प्यावा. फ्रिजमध्ये ठेवून नंतर काही वेळाने कधीच पिऊ नये.
५) रोजच्या आहारात कोंड्यासहित धान्य आणि हिरव्या पालेभाज्यांचा सढळ वापर करावा.
६) आहारात जास्तीत जास्त ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.
७) प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारी फळे भरपूर प्रमाणात खावीत.
८) मसालेदार चटपटीत पदार्थ शक्यतो टाळावेत.
९) मिठाई, साखर, तेल, तूप कमीत कमी खावेत.
१०) वरचेवर स्वतःचे वजन करून उंचीच्या प्रमाणात वजन राखण्याचा कटाक्षाने प्रयत्न करावा.
११) फायबरयुक्त अन्न उदा. पालेभाज्या. मोडाची कडधान्ये रोज खावीत.
१२) संतुलित आहार घेण्याचा नेहमी प्रयत्न करावा.
वजन कमी होत नाहीये मग या टिप्स नक्की फोलो करा…..

0 टिप्पण्या