कपाळावरील मुरूमे कसे थांबवावे Forehead acne’s

कित्येक वेळा तरुणांमध्ये कपाळावर फोड येतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे केसांमध्ये कोंडा होणे, पचनक्रिया बिघडणे, एखादे संक्रमण, लिव्हर इन्फेक्शनन इत्यादी.



अशा या समस्येत केसांची व त्वचेची स्वच्छता महत्वपूर्ण आहे. दिवसभरात मधून मधून हात साबणाने चांगल्या प्रकारे धुवावेत. चेहरा सेलिसिलिक अॅसिडयुक्त फेसवॉशने दिवसातून दोनवेळा धुवावा. केस छोटे राखावेत. लांब असल्यास मागील बाजूस बांधावेत. केस चेहऱ्यावर येऊ नयेत याकडे लक्ष द्यावे. याचबरोबर चेहऱ्याला हाताने कमीत कमी स्पर्श करावा. चेहऱ्याला वारंवार हात लावू नये.


हेअर बॅण्डस्चा उपयोग करू नये. कारण हे घाम शोषून घेतात. धुम्रपान कमी करावे. अॅक्टीव्ह स्मोकर्समध्ये एक्ने अधिक होतात.


हेअर स्प्रे अत्यंत सावधानीने करावे. कारण यांनी रोमछिंद्र बंद होऊ शकतात केस बांधून ठेवावेत. लक्ष द्यावे की, केसांचा शॉम्पू पूर्णपणे साफ केला जाईल. केसांत आणि कपाळावर शॉम्पूचे अंश राहिल्यास अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. तसेच, आवश्यक असल्यास हेअर स्टाईल बदलावी. दररोज केस धुवावेत. केसांतील व त्वचेच्या कोड्यांचा उपचार करावा.