Daal-वरण उरल्यास ? वरणाचे हे थालीपीठ तुम्हाला नक्कीच आवडतील..
वरण हा एक प्रकारचा पौष्टिक आहार आहे. वरणामध्ये भरपूर प्रोटीन असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. उरलेल्या वरणाच काय करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? आज आपण वरण उरल्यास त्याचे थालीपीठ कसे करायचे हे पाहूयात…
साहित्य : २ वाट्या वरण, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, १ मोठा कांदा, चिमूटभर हळद, पाव चमचा जिरे, ४ चमचे तेल, कोथिंबीर.
कृती : २ वाट्या वरणात सर्व पिठे एकत्र करून त्यात हळद, मीठ, तिखट, जिरे, कोथिंबीर व कांदा बारीक चिरून असे सर्व घालून सरबरीत भिजवावे. तव्यावर २ चमचे तेल घालून पातळसर थालिपीठ लावावे. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे.
वरणाचे हे थालीपीठ तुम्हाला नक्कीच आवडतील.

0 टिप्पण्या